vasant munde about me home page 400 x 545 (400 × 547 px) (3)

परिचय

राईटर & फायटर

लाडझरी या एका अत्यंत लहानश्या अश्या खेडेगावात, एका अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर कुटुंबात जन्माला आलेले वसंत मुंडे यांचा रोजगार हमी योजनेवर काम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सारख्या प्रतिष्ठित आणि विशाल संघटनेचा प्रदेशाध्यक्ष, महत्वाच्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी होईपर्यंतचा जीवन प्रवास खरोखर प्रत्येकासाठी खूप प्रेरणादायी आहे.
रोजगार हमी योजनेवर आपल्या मजुरीसाठी दिलेल्या लढ्यातून त्यांच्या पत्रकारितेतील प्रवासाला सुरुवात झाली पण त्यांचे कार्यक्षेत्र त्यांनी पत्रकारितेच्या पेश्यापुरते मर्यादित ठेवले नाही. फक्त बातमी देण्यापलीकडे जाऊन त्यांनी आपली लेखणी अन्यायाला वाचा फोडायला, विकासाला बळ द्यायला; ऊस तोडणी कामगारासारख्या शेवटच्या माणसाची व्यथा मांडण्यापासून तर पत्रकारांच्या मागण्या मंत्रालयापर्यंत नेण्यासाठी वापरली. महानेत्रदान शिबीर घेणे, रक्तदान मोहिमेतून एकाच दिवशी चक्क १६०० पिशव्या रक्तसंकलनाचा विक्रम करुन दाखवणारा हा माणूस उत्तम पत्रकार तर आहेच पण तेवढाच चांगला समाज परिवर्तनाचा दूतही आहे.
त्यांच्या सामाजिक योगदानाबरोबरच त्यांनी पत्रकारांचा नेता म्हणून केलेलं कामही खूप महत्वाचे आहे. अधिस्वीकृतीचा प्रश्न असो किंवा साप्ताहिक सुट्टीसारखी योजना यातून त्यांचा कुठल्याही प्रश्नाकडे बघण्याचा समग्र दृष्टिकोन लक्षात येतो. त्यांच्या ‘वृत्तपत्रातील अर्थकारण’ या भूमिकेचे तर वृत्तपत्र जगतातून प्रचंड स्वागत झाले. जवळपास ३००पेक्षा अधिक दैनिकांनी वृत्तपत्राचे अर्थकारणाच्या मुलाखतीला प्रसिद्धी देऊन त्यांचे नेतृत्व सर्वमान्य असल्याची पावतीच दिली. त्यांच्या पत्रकारितेतील मूल्यांवरील त्यांची निष्ठा, परिश्रम व सातत्य यामुळे पद, पारितोषिक व सन्मान त्यांच्याकडे आपोआपच येत गेले. यातूनच ते महाराष्ट्र राज्य पत्रकार मराठी संघ, मुंबई सारख्या प्रभावी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष झाले. नुकताच, दुबई इथे त्यांना आंतरराष्ट्रीय मानाचा सोशल एक्सलन्स इन जर्नालिझम हा पुरस्कार मिळाला.

पत्रकार संवाद यात्रा

वृत्तपत्र व पत्रकारांसाठी शाश्वत आणि दुरगामी योजनांचा आग्रह धरुन राज्यभर एक मोठी चळवळ उभी करत असताना वसंत मुंडे यांनी २८ जुलै २०२४ रोजी आणखी एक क्रांतिकारक पाऊल टाकले. यापूर्वी कधीच कोणाच्या लक्षातही आले नाही असा विषय समोर आणला. दीक्षाभुमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढून मुंडेनी संपूर्ण राज्याचे लक्ष एका दिशेने वळवले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर घटनाकार आहेत त्यापूर्वी ते पत्रकार होते. अशा महामानवाच्या दिक्षाभूमीवर वंदन करुन पत्रकारांसाठी एक ऐतिहासिक जागर सुरु केला.

विदर्भ, खान्देश, उत्तर महाराष्ट्र हा पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोकण विभागांत यात्रा गेली. एकूण २७ जिल्ह्यांच्या
ठिकाणी आणि १५० पेक्षा अधिक तालुक्यांमधून साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास करून २० ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात यात्रेचा समारोप झाला.

२४ दिवसांच्या यात्रेला मिळालेला प्रतिसाद न भुतो न भविष्यती असाच. गरजवंत पत्रकार रस्त्यावर उतरले. परिवर्तनाची एक नवी लढाई या माध्यमातून सुरु झाली. पत्रकारांचा नायक म्हणून महाराष्ट्राने आता वसंत मुंडे या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. येणाऱ्या काळात पत्रकारांचा हा आवाज आणखी बुलंद होत राहिल.

पत्रकारांचा नायक ...!

पत्रकार संवाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व तर होताच पण या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाने आणखी एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे पत्रकारांचा नायक म्हणून महाराष्ट्राने वसंत मुंडे या नावावर केलेले शिक्कामोर्तब. या घटनेचे सविस्तर विश्लेषण करणारा ‘पत्रकारांचा नायक …!” हा पत्रकार संतोष मानूरकर यांचा लेख तुम्ही नक्की वाचला पाहिजे. वसंत मुंडे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीपासून तर पत्रकार संवाद यात्रेपर्यंत दिलेल्या योगदानाचा नीट लेखा-जोखा या लेखात मांडला आहे.

पुरस्कार

एबीपी माझाचा अनमोल रत्न पुरस्कार

पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे दखल घेत एबीपी माझा न्युज चॅनलने उद्योग मंत्री उदय सामंत, एबीपी माझाचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर, तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुंबईतील कोर्टयार्ड मेरिट या पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर २०२३ हा सोहळा संपन्न झाला, राज्यभरातील विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर व महाराष्ट्रातील पत्रकार उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि Aeon play च्या माध्यमातून वृत्तपत्र व डिजिटल माध्यमात केलेल्या नाविन्यपूर्ण कामाची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल एबीपी माझाचे राजीव खांडेकर याचे वसंतराव मुंडे यांनी आभार मानले.

इंटरनॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम

लोकमत मीडिया ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दुबई येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना या वर्षीचा ‘एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम अवार्ड’ देऊन सांस्कृतिक कार्यमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार, लोकमतचे प्रमुख मा. राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. माध्यमक्षेत्रातून आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेले वसंत मुंडे हे पहिले व एकमेव आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे मजबूत संघटन उभे करून वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या याविषयी सकारात्मक बदल करणारे वसंत मुंडे यांच्या कामाची दखल या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

महाराष्ट्रासह देशभरात मराठी वृत्तपत्रातील आघाडीच्या लोकमत मिडिया समूहाचा या वर्षीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा रविवार २८ व २९ मे रोजी दुबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमतचे प्रमुख राजेंद्र दर्डा, आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री नुसरत भरूचा, दुबई स्पोर्ट सिटी चे अब्दुल रहमान फलकनाथ, मसाला किंग अल हिदा ग्रुपचे धनंजय दातार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

मुंडेंचे कार्य चौफेर मान्यवरांकडून कौतुक 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी  पंचवीस हजारा पेक्षा अधिक  पत्रकार सदस्य असलेल्या संघटनेला विविध उपक्रम राबवून सामाजिक चेहरा दिला. प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी उपाय सुचवले त्यामुळे त्यांचे संघटना व सामाजिक कार्य चौफेर असल्याने त्यांचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे अशा शब्दांत मान्यवरांनी कौतुक केले. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुणे येथील राज्यस्तरीय अधिवेशनत पत्रकार बाबा देशमाने यांनी संपादित केलेल्या प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, पत्रकार निरंजन टकले, लेखक अरविंद जगताप,महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव आमदार  उमा खापरे, उपस्थितीत होत. तर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

मीडिया

आंतरराष्ट्रीय स्तरावरील “एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम ” पुरस्कार मिळाल्याने हितचिंतक, मित्र यांच्य्या सद्दिच्छा जणूकाही पुरचं आला. कित्येकांनी वसंत मुंडे याना प्रत्यक्ष भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दुबईतील पुरस्कार सोहळ्यातील काही आणि शुभेच्छा देणाऱ्या मित्रासोबतचे काही क्षण इथे कॅमेऱ्यात टिपून मांडले आहेत.

“एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम” पुरस्काराची माध्यमांनी घेतलेली दखल

वसंतपर्व

ग्रेट-भेट

राजकीय जनसंपर्क

नेतृत्व

एक व्यापक दृष्टिकोन असणारे सक्षम नेतृत्व

पत्रकार म्हणजे सामान्यांचे प्रश्न सरकारपर्यंत नेणारा माणूस असतो. पण याचा अर्थ पत्रकारांना समस्या, प्रश्न नसतात असे नाही. इतर सर्व नागरिकांप्रमाणे पत्रकारांच्याही काही समस्या असतात, पत्रकारांवरही कधी कधी अन्याय होतो, कोरोना सारख्या संकटात त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होतो, पत्रकारांनाही कुटुंब असते, आर्थिक गणिते असतात. या सर्व प्रश्नांना एक पत्रकार वैयक्तिक पातळीवर तर उत्तर देतच असतो मात्र अशा प्रश्नांना भिडण्यासाठी त्याला गरज असते संघटनशक्तीची आणि संघटनेला गरज असते एका सक्षम नेतृत्वाची…! 

वसंत मुंडे व्यापक दृष्टिकोन असणारे सक्षम नेतृत्व आहे, हे त्यांनी वेळोवेळी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

महाराष्ट्र, गोवा, गुजरात या तीन राज्यात मराठी भाषिक १७००० हून अधिक पत्रकारांच्या मजबूत संघटनेची निर्मिती केली. या संघाच्या माध्यमातून पत्रकार, संपादक यांच्या समस्या ते सरकार आणि समाजापर्यंत नेतात.

औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मुंडे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रत्येक जिल्ह्यात शासकीय समितीची पत्रकारांबरोबर थेट खुली चर्चा हा उपक्रम राबवला. त्यातून जाचक अटी शिथिल होऊन अधिस्वीकृती पत्रिका मिळण्याचा मार्ग सोपा झाला. त्यांच्या या योगदानाची दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही घेतली.

कोरोना, ऑनलाईन वाचन इ. अनेक कारणांमुळे वृत्तपत्रांचे आर्थिक गणित बिघडले, अनेक पत्रकारांना पगार कपातीला समोर जावे लागले तर काहींना आपली नोकरी गमवावी लागली. अशा परिस्थितीत वसंत मुंडे यांनी औरंगाबाद येथे संपादकांची पहिली गोलमेज परिषद घेऊन वृत्तपत्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचं आवाहन केले. सर्व वस्तूंच्या बाजारातील किंमती वाढत असतांना वृत्तपत्रांच्या किमतीत मात्र तशी वाढ झाली नाही. उत्पादनखर्चापेक्षाही कमी किंमतीत वृत्तपत्रे विकली जातात हे असे एकमेव उत्पादन आहे. जाहिरात कमी झाल्याने तोटा भरून काढणे अशक्य आहे अश्या वेळी विक्री किंमत वाढविण्याचे गणित वृत्तपत्रांचे मालक, संपादक, वितरक यांना पटवून दिले. त्यांची ‘वृत्तपत्रांचे अर्थकारण’ ही मुलाखत ३००पेक्षा अधिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली. एका पत्रकाराची मुलाखत विविध दैनिकांत प्रसिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ. वसंत मुंडे यांचे नेतृत्व सर्वमान्य असल्याची ही जणू पावतीच होती.

वृत्तपत्र व्यवसाला ऊर्जा मिळावी म्हणून केंद्र सरकारने करदात्यांना वृत्तपत्र खरेदीवर पाच हजारांची सवलत द्यावी अशी मागणी वसंत मुंडे यांनी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली. इतर सर्व उद्योग व्यवसायाप्रमाणे वृत्तपत्रांनाही साप्ताहिक सुट्टी असावी असा विचार त्यांनी मांडला. अशा सुट्टीचे आर्थिक आणि आरोग्याचे फायदे मिळतील अशी त्यांची मांडणी आहे.

सामाजिक पत्रकारिता

पत्रकारितेतून समाजपरिवर्तन

पत्रकारिता हे सामान्यांचा आवाज शासन-प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम आहे याची जाणीव वसंत मुंडे यांना अगदी लहान वयात झाली. पुढे पत्रकार झाल्यावरही सामान्य, उपेक्षित, वंचित घटकाचे म्हणणे ते समाजापर्यंत , सरकारपर्यंत पोहचवत राहीले. माध्यमांची भूमिका ही फक्त सत्तेशी संघर्ष करण्याची नाही तर योग्यवेळी सहकार्य करून सकारात्मक बदल करण्याची देखील आहे असं ते मानतात. वृत्तपत्र हे विधायक कामासाठी समाजाला एकत्र आणणारे व प्रसंगी समाजप्रबोधन करणारे माध्यम आहे हे लक्षात ठेऊनच ते सतत २० वर्षं लिहीत आले आहे. आपल्या कामातून त्यांनी पत्रकारिता हे फक्त बातमी लोकांपर्यंत पोचविण्याचे माध्यम नसून ते प्रत्यक्ष समाजपरिवर्तनाचे माध्यम आहे हे सिद्ध केले आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊस तोड मजुरांची व्यथा समजून घेण्यासाठी त्यांनी १० दिवस प्रत्यक्ष ऊस तोड कामगारांबरोबर राहून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ऊस तोड कामगारांच्या व्यथा सांगणारी क्रमिक लेखमालिका लोकपत्र या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. ऊस तोड कामगारांची व्यथा या लेखमालेने अतिशय प्रभावीपणे समाज व सरकारपुढे आणली. या पहिल्याच लेखमालेस समर्थन संस्था मुंबई द्वारे राज्यातील पत्रकारांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. वंचित, अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या ४ बिगरसरकारी संस्थांचे काम त्यांनी लोकांपुढे आणले व लोकसहभागातून जवळपास ४ कोटी रुपयांचा निधी त्यांनी या संस्थांना उपलब्ध करुन दिला.

सोशल मीडिया

बीड येथे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर 2026 रोजी (नगर रोड तहसील समोर बीड ) कार्यालयात त्यांची भेट पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संपादक संतोष मानुरकर,दिलीप खिस्ती यांनी शुभेच्छा दिल्या.#pankajagopinathmunde ... See MoreSee Less
View on Facebook
View on Facebook
प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईपत्रकार संवाद यात्रा चे काही क्षण #vasantmunde #police #journalist #media #power ... See MoreSee Less
View on Facebook
#beed #zpschool #school #education #zilhaparishadschool ... See MoreSee Less
View on Facebook
#vasantmunde #pankajatai_gopinathrao_munde #parlivaijanth #beed #railway ... See MoreSee Less