
पत्रकार संवाद यात्रा
“लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी” हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी- नागपूर ते मंत्रालय-मुंबई अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेला २८ जुलै २०२४ला प्रारंभ झाला.
संपूर्ण राज्यभर सर्वाधिक सदस्य संख्या असलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई ही एकमेव संघटना आहे. या संघटनेचे सक्षम नेतृत्व प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा आयोजित केली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथून या पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याला २८ जुलै रोजी प्रारंभ झाला.
नागपूरच्या दीक्षाभूमीवर प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाने पत्रकार संवाद यात्रेला २८ जुलैला सुरुवात झाली . त्यानंतर वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, मुक्ताईनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि पहिल्या टप्प्याचा समारोप शिर्डी येथे झाला. दुसरा टप्पा १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथून होईल आणि २० ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे समारोप झाला. या यात्रेत एकूण २७ जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि १५० पेक्षा अधिक तालुक्यांमधून साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास करून राज्यभरातील पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे जेष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी संवाद झाला.
पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा आहे. तो समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे. लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या पत्रकारांचेही प्रश्न असतात याची जाणीवच राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना नाही. या सर्व बाबींचा संवाद यात्रेत उहापोह झाला.
प्रमुख मागण्या
केंद्र सरकारकडे पाठविण्याचे प्रस्ताव :
१) केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना (डिजीटलसह) उत्पन्न करात वार्षिक ५००० सूट द्यावी. असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा.
२) सरकारने वृत्तपत्रात प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींवरील ५ % जीएसटी कर रद्द करावा. यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव द्यावा.
राज्य स्तरावरील मागण्या :
१) वृत्तपत्र व माध्यमसमूहांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
२) माध्यम क्षेत्रासाठी स्वतंत्र स्टेट प्रेस कौन्सिल निर्माण करावे.
३) विधानपरिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्यत्वासाठी पत्रकारांमधून निवड करावी.
गृह विभाग स्तरावरील मागणी :
१) पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला आहे, मात्र स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी पोलिस प्रशासनाला आदेश द्यावेत.
२) अलीकडे बातमी प्रसिद्ध किंवा दाखवण्यात आली की थेट पोलिस ठाण्यात पत्रकारांविरूध्द गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रसिद्ध बातमीबाबत पत्रकाराविरुद्ध तक्रार आल्यास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करूनच गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी. यासाठी पोलिस विभागाला निर्देश द्यावेत.
ग्रामविकास विभाग स्तरावरील मागणी :
१) महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींना वार्षिक आराखड्यात गाव तिथे ग्रंथालय धोरणाअंतर्गत स्थानिक वृत्तपत्र खरेदीसाठी १० हजार रुपये तरतूद करावी यासाठी ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश काढावा.
२) स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरील शासकीय समित्यांवर पत्रकारांमधून एक प्रतिनिधी घ्यावा.
३) शासकीय, निमशासकीय शाळा महाविद्यालयांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करावी.
माहिती आणि जनसंपर्क विभागाकडील मागण्या :
१) आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील सलग तीस वर्षे सेवेची अट शिथील करून प्रक्रिया सुलभ करावी. तसेच दाखल झालेले प्रस्ताव सहा महिन्याच्या मर्यादेत निकाली काढून पेन्शन सुरू करावी. सध्या तीन वर्षे झाले तरी प्रस्ताव मंजूर होत नाहीत.
२) अधिस्वीकृती पत्रिका ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळावी यासाठी वेतन चिठ्ठीची अट रद्द करावी. कारण बहुतांशी पत्रकार मानधनावर काम करतात. संपादकांच्या शिफारशीनुसार जिल्हा दैनिकांच्या तालुका वार्ताहरांनाही अधिस्वीकृती देणेबाबत प्रक्रिया सुलभ करावी.
३) अधिस्वीकृती मंजूर करताना दुय्यम व्यवसाय नसल्याचे प्रतिज्ञापत्र देण्याची अट रद्द करावी.
४) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पुर्वीप्रमाणे रेल्वेत ५० टक्के आरक्षण आणि स्लीपर कोच बस, विमान प्रवासात सवलत द्यावी.
५) सरकारने घोषणा केल्याप्रमाणे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या वाहनांना महामार्गावर टोलमाफीसाठी स्वतंत्र आदेश द्यावेत.
६) २०१८ च्या शासन धोरणानुसार जाहिरातींच्या दरात दर दोन वर्षांनी नियमितपणे वाढ करावी.
७) शासकीय पुरस्कार दरवर्षी दर्पण दिनी वितरीत करावे यामध्ये तीन वर्षापासून खंड पडला आहे.
८) शासकीय जाहिरातीचे वितरण करताना स्थानिक पातळीवरील जिल्हा दैनिके, साप्ताहिके यांच्यावर वर्गवारीच्या नावाखाली होणारा अन्याय थांबवावा. समान न्यायाच्या धोरणाने वितरण व्हावे. तसेच महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक दैनिके व साप्ताहिकांना प्राधान्याने जाहिरात द्यावी. वर्षातून चार दर्शनी जाहिराती पुन्हा नव्याने सुरू करण्यात याव्यात.
९) कोरोना काळात वृत्तपत्रांच्या खपावर परिणाम झाला असल्याने द्विवार्षिक पडताळणीत खपाबाबतचे नव्याने धोरण निर्माण करावे. तसेच शासन यादीवर येण्यासाठी एक हजार अंक खपाची मर्यादा करावी.
१०) दरवर्षी माध्यम संस्थेकडून पत्रकारांची यादी घेवून पत्रकारांची अधिकृत गणना करून शासकीय लाभ देण्याचा निर्णय घ्यावा.
११) वीस वर्षे पूर्ण केलेल्या नियमित दैनिके व साप्ताहिके यांना द्विवार्षिक पडताळणीतून वगळावे.
१२) अधिस्वीकृती समिती राज्य आणि विभाग स्तरावर कामगार कायदा (लेबर युनियन अॅक्ट १९२६) अंतर्गत नोंद असलेल्या संघटनांना प्रतिनिधित्व द्यावे.
१३) मुंबईप्रमाणे म्हाडा अंतर्गत शासकीय जमीन म्हाडाला देऊन जिल्हा व तालुका स्तरावर पत्रकारांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प राबवावा.
१४) जुनी वर्तमानपत्रे ही मूल्यवान ठेवा असल्याने ऐतिहासिक घटना जतन करण्यासाठी त्यांना संगणीकृत करण्यासाठी विशेष सवलत द्यावी.
१५) डिजिटल मिडियाला (न्युज पोर्टल, युट्यूब चॅनेल) निकष ठरवून शासनमान्यता द्यावी.
१६) जिल्हा, तालुका पातळीवरील प्रमुख शासकीय कार्यालयात पत्रकार कक्ष स्थापन करावा.
१७) माध्यम समूहाकडून नाममात्र मानधन मिळत असल्याने सलग पाच वर्षे सेवा केलेल्या पत्रकारांना शासनाने दरमहा मानधन योजना सुरू करावी.
डिजिटल कव्हरेज
प्रिंट मीडिया कव्हरेज
- सर्व
- २७ जुलै
- २८ जुलै
- 29 जुलै
- 30 जुलै
- 30 जुलै

नागपूर पत्रकार परिषद

नागपूर पत्रकार परिषद

नागपूर पत्रकार परिषद

नागपूर पत्रकार परिषद

पत्रकार संवाद यात्रेचा शानदार शुभारंभ
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेचा शानदार शुभारंभ रविवार, दि. २८ जुलै २०2४ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे , मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, माजी विधीमंडळ अध्यक्ष चंदन शिवराळे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, समन्वयक संतोष मानुरकर, निलेश सोमाणी यांच्यासह राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार संवाद यात्रेचा शानदार शुभारंभ
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेचा शानदार शुभारंभ रविवार, दि. २८ जुलै २०2४ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे , मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, माजी विधीमंडळ अध्यक्ष चंदन शिवराळे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, समन्वयक संतोष मानुरकर, निलेश सोमाणी यांच्यासह राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































डाउनलोड
पत्रकार सवांद यात्रेचे दस्तऐवज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी इमेजवर क्लिक करा.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील “एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम ” पुरस्कार मिळाल्याने हितचिंतक, मित्र यांच्य्या सद्दिच्छा जणूकाही पुरचं आला. कित्येकांनी वसंत मुंडे याना प्रत्यक्ष भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दुबईतील पुरस्कार सोहळ्यातील काही आणि शुभेच्छा देणाऱ्या मित्रासोबतचे काही क्षण इथे कॅमेऱ्यात टिपून मांडले आहेत.













2 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.3 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.3 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.3 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.4 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.पत्रकारांचा नायक...!
































































































