स.मा.गर्गे पुरस्कार


जेष्ठ पत्रकार, कोशकार, इतिहासाचे अभ्यासक स.मा.गर्गे यांची बीड जिल्हा ही जन्मभूमी असल्यामुळे याठिकाणी जिल्हा पत्रकार संघाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सुरु केला. या पुरस्कार योजनेला १० वर्षे पुर्ण होत आहेत.
पहिला स.मा.गर्गे पुरस्कार भारतकुमार राऊत यांना देण्यात येऊन पुढील काळात एकूण १० प्रतिभावान पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला.
पत्रकार संघाच्या पुढाकारातून बीड शहरात स्व.स.मा.गर्गे यांचे अद्वितीय असे स्मारक बांधण्यात आले असून या ठिकाणी वाचनालय , अभ्यासिका, ई-लायब्ररी आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु झाले आहे.

पत्रकार संघाच्या पुढाकारातून बीड शहरात स्व.स.मा.गर्गे यांचे अद्वितीय असे स्मारक बांधण्यात आले असून या ठिकाणी वाचनालय , अभ्यासिका, ई-लायब्ररी आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु झाले आहे.

सदाशिव मार्तंड गर्गे

जन्म: ४ नोव्हेंबर १९२०
मृत्यू : ४ नोव्हेंबर २००५

जन्म: ४ नोव्हें. १९२० रोजी लघुरी ता. केज, जि. बीड येथे झाला.
कौटुंबिक माहिती: वडील मार्तंड शंकर गर्गे, आई प्रयागबाई. पत्नी लिलाबाई (अंबेजोगाईच्या बाबासाहेब खुरसाळे यांची कन्या) एक मुलगा. तीन मुली.

नोकरी: १९४०-४५ सरस्वती भूवन माध्यमिक शाळा औरंगाबाद येथे शिक्षण. १९४५-१० दै. तरुण भारत नागपूर येथे ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांना संपादक म्हणून काम करण्यासाठी बोलावले. १९५०-५९ दै. सकाळ पुणे येथे संपादकीय सहाय्यक, १९५९-७० दै. विशाल सह्याद्री पुणे येथे वृत्त संपादक.

 

वैचारिक लेखन : १९५५ पासून सामाजिक शास्त्र, भारतीय इतिहास, इ. विषयावरील स्वतंत्र नव्या विचारांची मांडणी करणाऱ्या लेखनास सुरुवात राज्यशास्त्राचा विकास हे पहिले पुस्तक प्रकाशित. १९७३-७५ या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे वृत्तपत्रविद्या विभागाचे संस्थापक संचालक.

१९५९ साली स.मा.गर्गे व्हिएन्ना येथे जागतिक पत्रकार परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले.

दै. सकाळमध्येच त्यांनी पाकिस्तानचा फेरफटका सदर दीर्घकाळ पर्यंत लिहीले.

साप्ताहिक साधना व महाराष्ट्र टाईम्स मधून मुस्लिम मनाचा कानोसा हे सदर यांनी लिहिले. त्याला लोकप्रियता मिळाली.

१९६१ साली दै. विशाल सह्याद्री या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून त्यांनी पदभार घेतला व सडेतोड अग्रलेख लिहीले.

आकांक्षा पत्रकारितेची हा ग्रंथ त्यांनी लिहीला. पुणे पत्रकार संघाचे अध्यक्षपद, वृत्तविद्या प्रबोधिनीचे कार्याध्यक्षपद त्यांनी सांभाळले. पुण्यातील प्रसिद्ध अशा लाड व्याख्यानमालेत त्यांचे आकाशवाणीवर व्याख्यान झाले. दै. केसरीमधूनही त्यांनी लिखाण केले.

समाज विज्ञान कोशाची निर्मिती हे त्यांचे अजोड कार्य आहे. जवळपास १० वर्षे अखंड परिश्रम घेऊन त्यांनी कोशाचे सहा खंड प्रसिद्ध केले.

गोविंद सरदेसाई यांच्या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. हिंदूस्तानचा अवचित इतिहास (इ.स.१००० ते १८५८) मुसलमानी रियासत दोन खंडात आहे. मराठी रियासत आठ खंडामध्ये आहे. अशा प्रमुख निवासींची १२ खंड त्यांनी संपादीत व प्रकाशित करण्याचे महत्कार्य केलेले आहे.

इतिहासाची साधने: एक शोधयात्रा हा ग्रंथ त्यांनी सन १९९४ साली प्रसिद्ध केला. स्वामी रामानंद तिर्थांचा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ वाचून त्यांनी साहित्यिक लिखानाला सुरुवात केली. आगरकरांचा लेखसंग्रह वाचून चिंतन विचार मांडायला सुरुवात केली. लोकहितवादी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ त्यांनी वाचले. व्हाय सोशालिझम या जयप्रकाश नारायण यांच्या पुस्तकातून त्यांनी समाजवादी विचार स्विकारले.

१९९७ साली शिरुर ताजबंद जि.लातूर येथे झालेल्या २० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले.

मराठवाड्यातील गरीब, होतकरु विद्यार्थ्यांसाठी कै. शंकरराव चव्हाण यांच्या सहकार्याने त्यांनी पूणे येथे मराठवाडा मित्र मंडळाची स्थापना केली. या मंडळाचे ते कार्याध्यक्ष राहिले.

स.मा.गर्गे यांचे निधन वयाच्या ८५ व्या वर्षी झाले. ४ नोव्हेंबर ही त्यांची जन्मतारीख आणि त्याच तारखेला मृत्यु यावा हा एक समसमा योगच म्हणावा लागेल. महात्मा गौतम बुद्धाप्रमाणे जन्म झालेल्या तारखेसच निर्वाणही झाले. संत एकनाथांच्या जीवनात षष्टीचे महत्व असेच आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील “एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम ” पुरस्कार मिळाल्याने हितचिंतक, मित्र यांच्य्या सद्दिच्छा जणूकाही पुरचं आला. कित्येकांनी वसंत मुंडे याना प्रत्यक्ष भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दुबईतील पुरस्कार सोहळ्यातील काही आणि शुभेच्छा देणाऱ्या मित्रासोबतचे काही क्षण इथे कॅमेऱ्यात टिपून मांडले आहेत.